स्वप्नसुंदरी

शोधतो मी स्वप्न परी या धरती वरी

न भेटे ती मनचाहती मनमोहिनी

शोधू कुठे मी तिला या धरती वरी

न भेटे ती मनवाहिनी मनरागिणी

स्वप्नरंगिनी कधी येते ध्यानीमनी

सजवून जाते प्रेमलहरी मनाअंतरी

प्रेमबावरी प्रेमहरणी ती छाया

कोरून बसली मज मनाअंतरी

जीवनाच्या या वाटेवरती

वाट पाहतो या स्वप्नपरीची

मज न माहित कधी भेटेल हि

स्वप्नपरी......


                   लेखक- किरण लोंढे 


Post a Comment

8 Comments