स्वप्नांच्या रंगीत दुनियेत रोज मी तुला पाहतो
सांग सजनी कधी येशील तू मी तुझी वाट पाहतो
तुझ्या नटखट नखऱ्यामुळे मी फुलून जातो
तुझ्या प्रेमळ चाळ्या मुळे मी खुलून जातो
सांग सजनी कधी येशील तू मी तुझी वाट पाहतो
जिवनात तुझ्या प्रेमाचा रंग हवा हवासा वाटतो
तुझ्या स्पर्शाने मला मीच नवा नवासा वाटतो
सांग सजनी कधी येशील तू मी तुझी वाट पाहतो
जीवनाच्या पटावर तुझ्या प्रेमाची साथ मागतो
ऐनाऱ्या प्रत्येक सूख दुखत तुझी साथ मागतो
सांग सजनी कधी येशील तू मी तुझी वाट पाहतो

0 Comments