वेडा झालो रागात तुझ्या

वेडा झालो रागात तुझ्या
शून्य झालो प्रेमात तुझ्या

मला चिडवले तुझ्या नावाने
आवडले का ग मनास तुझ्या

होणार किती चेष्टा माझी
अपमान माझा बिलात तुझ्या

तुझा होकार येणार कधी
मी येणार का मनात तुझ्या

तुझ्या आठवणीत मी घेतली
झुलतो आहे नादात तुझ्या


Post a Comment

0 Comments