त्या गावात पहिल्यांदा, हिरव रान मी पहिल

त्या गावात पहिल्यांदा, हिरव रान मी पहिल
तुझ्या रुपाकड पाहून, मन माझ बी फुललं

कस माघ माघ फिरणं, कधी झालं ना कळलं
तुझ्या निखळ हसण्यानं, मन माझ बी झुलल

सोन्याच्या त्या पानावर, जे मनातलं ते ओतलं
वाट पाहत त्या वाटेवर, कधी कधी तू येणार

लव लेटर ते लिहिलेलं, माझ्या जवळच राहील
राग माझा तुला येऊन, हा मनी विचार करून

गेलं वरीस तुझ्या माग, झाला शेवटचा पेपर
झाली तू माझी मैत्रीण, दिलं लग्नाचं आमंत्रण

तुझ्या बापाने ठरील, मन माझ हे मारून
घरी परक्याच्या देऊन, तुझ लगीन ठरलं

तुझ्या दारात मांडव, तुझ्या गालावर हळद
हळद दुसऱ्याची पाहून, मन माझ हे झुरल

सात फेरे तू घेताना, डोळ गेलं हे पानाऊन
खाली अश्रू ते गळताना, डोळ लपून पुसील

उर भरून आला ग, ते दृष्य डोळ्यांन पाहून
तुझ्या हातात तो हात, तुझ्या नवऱ्याचा पाहून

नाही आता ताकत, कस पाहू तुझ्या नजरेत
नव्या सासरी तू जाताना, डोळ फुटून रडलं

तुझ्या विना ग जगताना, मी आज हे ठरिल
मनातल्या आठवणींना, दडून मनातच ठेवीन

समोर तुला मी ठेऊन, एवढं सारं मी लिहिलं
थांबतो सलामी देऊन, त्या नशीबवान नवऱ्याला




Post a Comment

0 Comments