थोडी चटकती थोडी मटकती
थोडी सटकती तू ग प्रिये
थोडी खुलून थोडी फुलून
थोडी दिलेर तु ग प्रिये
थोडी साजरी थोडी हसमुख
थोडी लाजरी तू ग प्रिये
थोडी हुशार थोडी चंचल
थोडी पागल तू ग प्रिये
थोडी निराळी थोडी वेगळी
खूप स्पेशल तू ग प्रिये
मोठी स्वप्ने मोठी भरारी
घेऊन उड ना तू ग प्रिये

0 Comments