नव्या नव्या ह्या मधुचंद्राला चांदण्यांची साथ हवी.....

मावळतीला सूर्य निघाला
आली वेळ चांदण्यांची
नव्या नव्या ह्या मधुचंद्राला
चांदण्यांची साथ हवी.....

दूर नको जाऊ आता 
आली वेळ मधुचंद्राची
नव्या नव्या ह्या मधुचंद्राला
चांदण्यांची साथ हवी.....

खबर घेऊ गुंग होऊन
श्वासात श्वास गुंतूनी
नव्या नव्या ह्या मधुचंद्राला
चांदण्यांची साथ हवी.....

दुःख सूख वाटून घेऊ
देहात देह मिसळुनी
नव्या नव्या ह्या मधुचंद्राला
चांदण्यांची साथ हवी.....

गप्पा गोष्टी करीत राहू
लवकर पोहचू मनामंदी
नव्या नव्या ह्या मधुचंद्राला
चांदण्यांची साथ हवी.....

धुंद होऊन जाऊ आता
प्रेमाच्या महासागरात वाहुनी
नव्या नव्या ह्या मधुचंद्राला
चांदण्यांची साथ हवी.....


Post a Comment

0 Comments