शाळेतली लेकरे

 चिलबिल चिलबिल करीत राहती 
अशीच राहतात शाळेतली लेकरे

प्रेमळ स्वभावाची भोळ्या मनाची
फुलांसारखी ही शाळेतली लेकरे

एकमुखाने आनंदाने नेहमी राहती
मोठ्या मनाची ही शाळेतली लेकरे

गोड मनाची निखळ हसतात ही
स्वतंत्र मनाची ही शाळेतली लेकरे

भविष्य देशाचे खांद्यावरी घेणारी
नवीन पिढी ही शाळेतली लेकरे

Post a Comment

0 Comments