चिमण्यांची चिव चिव, कोंबड्याची बाक
रामाच्या पारी, काय दादा सांगण र
ढवळ्या पवळ्या च्या संगतीन दादा वखर चालतय . .
शिवार नांगरून, खात बी भरून
पेरणीचा आला, आला मिरुग आला र
ढवळ्या पवळ्या च्या संगतीन दादा वखर चालतय . .
डोक्यावर फेटा, खांद्यावर चाबूक
हातात रुमण, पेरणीची घाई र
ढवळ्या पवळ्या च्या संगतीन दादा वखर चालतय . . .
चालता चालता, पायात काटा
मुचभर बारका, पर आगीचा भडका र
ढवळ्या पवळ्या च्या संगतीन दादा वखर चालतय . . .
निसर्गाची सात, पावसाची बात
शिवारात साऱ्या, पिकलय सोन र
ढवळ्या पवळ्या च्या संगतीन दादा वखर चालतय . . .
सालभर राबत, करून मेहनत
तरी जीवाला घोर, नाही मालाला भाव र
ढवळ्या पवळ्या च्या संगतीन दादा वखर चालतय . . .
नाही मला शौक, गळफास घ्यायचा
द्या मालाला हमीभाव, हा देश आमच्या बी बापाचा
आमच्या बी बापाचा, नाही अंबानी नि आडाणी चा
द्या मालाला हमीभाव र, द्या मालाला हमीभाव र . . .

0 Comments