उंबराच्या झाडावरती नाव तुझ कोरल
काल माझ्या स्वप्नामंदी मन माझ चोरल
तुझ्या माग माग माझ रोज रोज फिरणं
आल तुझ्या नजरमंदी मन माझ जडल
बाजारात फिरताना नजर शोधे कोणाला
आली होती बाजारात भाजीपाला न्यायला
लोकांच्या गर्दी मध्ये माझी नजर काही हटेना
भरल्या बाजारात मला भाव काही मिळेना

0 Comments