रोज मनाचा घात होत होता....

तो उभ्या रस्त्याने जात होता
तिरप्या नजरेने पाहिले त्याला
हा लक्ष सोडून मोहित झाला
अन् तिच्या प्रेमात गुंग झाला

ती नजरेत जी आली होती
हा लपून तिला पाहत होता
पुढे जाण्याचा विचार होता
पण मनातल्या मनात भित होता

आता तिनेही डाव टाकला होता
बोलायला शब्द मिळत न्हवता
नजरेचा खेळ सुरू झाला होता
रोज मनाचा घात होत होता

एके दिवशी इशारा झाला होता
भेटण्याचा दिवस ठरला होता
ठरलेल्या दिवशी हा आला होता
ती लग्न पत्रिका घेऊन उभी होती
लग्नाचं आमंत्रण द्यायला आली होती
पत्रिका देऊन लग्नाला ये म्हणाली 
हा लग्नाची पत्रिका पाहताच राहिला
रोज मनाचा घात होत होता

तेथे लग्नाचं मांडव सजला होता
नवरदेव घोड्यावर बसला होता
मामा नवरीला घेऊन आला होता
रोज मनाचा घात होत होता

तुटलेल्या मनाने राहत होता
ना अन्न न पाणी घेत होता
तो तिची वाट पाहत होता
रोज मनाचा घात होत होता

एका नजरेने वाया गेला होता
लक्ष त्याच विसरला होता
नंतर चूक ध्यानात ऐत होती
तेंव्हा तो एकटाच माघे राहिला होता
रोज मनाचा घात होत होता.......


Post a Comment

0 Comments