हिरव्या साडीत दिसते तू
माझ्या रानाची लक्ष्मी
सांग कारभारणी होणार का
तू होणार का ह्या कुनाब्याची
जरा वळून बग माझ्याकडं
कसा दिसतो मी राजबिंडा
सखे अशी करत जाऊ नको
रोज रोज नजरेने माझी निंदा
मी आणला मी तुझ्यासाठी
आणला हा फुलांचा गजरा
एकदा घालून बग केसात
उठून दिसणार तुझा हा चेहरा

0 Comments