भूतकाळाची उजळणी केलो आज मी
आयुष्याला कलाटणी देलो आज मी
नाही फसणार तुझ्या चक्रात आता मी
पाऊले ही पारखून टाकतो आज मी
कर्म माझे सदा असणार प्रामाणिक
कर्माला न्याहाळून पाहतो आज मी
तू ठेवलेली घृणा मनात माझ्यासाठीची
ती घृणा ही प्रेमाने जिंकतो आज मी
वाईट काळात सोडले होते तू एकाकी
तुला ही सोबत घेऊन चालतो आज मी

0 Comments