रोज डी एम पाठवावे

सदा वाटते मला तुला आठवावे
ह्या सोशल जगात रोज डी एम पाठवावे

केली नाही कन्फॉम माझी इंस्टा रिक्वेस्ट
किती झालो व्याकूळ तुला कसे कळावे

रोज डी एम करून तुला थकलो आज मी
तुला नाही का वाटले मला रिप्लाय करावे

आज पाहिला डी एम, आणि रिप्लाय आला
का तुला वाटते किरण का तुला मी बोलावे

तुझ्या ह्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे
विचार करताना मधेच नेट पॅक संपावे





Post a Comment

0 Comments