भूतलावर सजीवांच्या, मी खडतर प्रवासी आहे
सरळ आयुष्य जगताना, आपुलकीचा मार आहे
झिजतो ज्यांच्या करिता, मनात त्यांच्या द्वेष आहे
कर्तव्य समजुनी माझे, कर्तव्य पार पाडत आहे
झोंबनाऱ्या मिरच्यांचा, अजून वार बाकी आहे
मनाची तैयारी करुनी, मी तुमची वाट पाहत आहे
किती वेळा सांगू मना, तो उषा खालचा साप आहे
रोज पंचमी असल्या गत, मी दूध पाजवत आहे
ठेवला विश्वास पुन्हा तरीही, बदल्यात घातच आहे
आपल्या माणसांमध्ये कितीतरी लबाड लांडगे आहे
वाकुनही वाकेना माज, कुत्र्याच्या शेपटा गत आहे
महिनाभर नळीत ठेवली, तरी शेपूट वाकडीच आहे

0 Comments