माणसांच्या गोंधळात

माणसांच्या गोंधळात हेटळले मला तू
समोर येऊनही तुझ्या नजरेस पडलो नाही

दिसते जरी मुखावर स्मित रम्य गोड हास्य 
पण कित्येक दिवस झाले मनातून हसलो नाही

कित्येक वेळा नजरेने असे हेटाळले मला तू
तरीही तुझ्यावर सखे कधीच रुसलो नाही

लगबग तुझ्या दारातली पाहून थक्क झालो
परक्या घरी तू जाताना मी पाहू शकलो नाही

काळजात तुझी प्रतिमा कोरून बसली तरीही
पुन्हा पुन्हा तुला पाहिल्या विणा राहू शकलो नाही







Post a Comment

0 Comments